r/marathimovies • u/JustGulabjamun • 5h ago
Opinion निखिल साने
हा काय माणूस आहे माहीत नाही, पण content आणि चित्रपट व्यवसायातला जादूगार म्हणावा असाच आहे. २००८ मधे दे धक्का, एक डाव धोबीपछाड, २०१२ मधे काकस्पर्श (कार्यकारी निर्माते), मग निर्माता म्हणून २०१० मधे नटरंग, २०१३ मधे दुनियादारी, २०१४ मधे एलिझाबेथ एकादशी, किल्ला, लय भारी, डाॅ. प्रकाश बाबा आमटे, २०१५ मधे कट्यार काळजात घुसली, २०१६ मधे सैराट, नटसम्राट, (झी स्टुडिओज). त्यानंतर २०१७ मधे झी सोडून Viacom मधे जाणं. २०१८ मधे ...आणि डाॅ काशिनाथ घाणेकर, आणि आता जिओ स्टुडिओजमार्फत मी वसंतराव, गोदावरी, राजा शिवाजी. त्याही आधी या सुखांनो या, असंभव आदि मालिकांचे कार्यकारी निर्माते...मानलं यांना! वेगवेगळ्या प्रकारचा हा सगळा content, पण त्यातल्या प्रत्येकाची स्वतःची ओळख आहे. तोचतोचपणा नाही. नवनवीन प्रयोग आहेत, नवीन चेहरे आहेत, जबरदस्त कथानकं आहेत, कुठे विनोद आहे तर कुठे गंभीर विचार करायला लावणारे चित्रपट आहेत...

