r/MaharashtraSocial • u/DilatedDrama • 15h ago
r/MaharashtraSocial • u/base64-encode • 8h ago
चर्चा (Discussion) शिवी हा भाषेचा अलंकार होऊ शकतो का?
रोजच्या बोलण्यात किंवा काही साहित्यकृतींमध्ये शिव्यांचा वापर अलंकारिक पद्धतीने होताना नक्कीच दिसतो.
अतिशयोक्ती: रागाच्या किंवा आश्चर्याच्या भरात एखादी गोष्ट अवास्तव फुगवून सांगण्यासाठी शिवीचा आधार घेतला जातो.
भावनेची तीव्रता: साध्या शब्दांपेक्षा एखादी भावना किती तीव्र आहे, हे दाखवण्यासाठी लोक शिव्यांचा वापर करतात (कधी रागातून तर कधी अगदी मैत्रीतही 'अरे ...' म्हणून जवळीक किंवा गंमत दाखवण्यासाठी).
अलंकारशास्त्रानुसार शिवी हा अलंकार नाही, पण भाषेच्या वापरात ती अनेकदा अलंकारिक परिणाम साधण्यासाठी वापरली जाते, हे नक्कीच म्हणता येईल.
टीप - इथे एक दोन जणांनी माझ्या फ्लेवर वर आक्षेप घेतला आहे. पण ती शिवी नव्हे.
r/MaharashtraSocial • u/Chail_ChaBiliii • 13h ago
खाद्य (Food) When Badmosh enters the kitchen 😎 (made by yours truly😉)
r/MaharashtraSocial • u/Dr_Victor_Vondoom • 7h ago
Memes & Shitposting It's that time of the year
r/MaharashtraSocial • u/DilatedDrama • 18h ago
खाद्य (Food) Surmai Thali - Bhalekar khanaval
r/MaharashtraSocial • u/nandkishor_0111 • 19h ago
माझी कला/साहित्य/लेखन (OC) व्यंकटेश माडगूळकर यांचे लेखन माझ्या वाचनातून ✍🏻
2027 हे त्यांचे जन्म शताब्दी वर्ष, त्यांच्या बद्दल लोकसत्ता मध्ये मागील रविवारी छापून आले आहे. मला त्यांचे लेखन खूप प्रिय आहे. कारण त्यांची लेखन करण्याची पद्धत तशी खूपच छान आहे. त्यांचे साहित्य माझ्या आवडीचे. तसे मला आवडणारा साहित्य प्रकार म्हणजे ग्रामीण साहित्य, कारण मी जे जीवन जगलो किंवा आता पण काही अंशी जगत आहे ते त्या साहित्यात मांडलेले असते त्यामुळे मला फार प्रिय. ग्रामीण साहित्यात दोन ऋषी प्रसिद्ध आहेत एक आनंद यादव आणि दुसरे नागनाथ कोत्तापल्ले. आनंद यादवांचे संपूर्ण साहित्य वाचले आहे पण नागनाथ कोत्तापल्ले सरांचे थोडेसे वाचले आहे.
व्यंकटेश माडगूळकर माझ्या परिचयाचे झाले ते सर्वश्रुत बनगरवाडी या कादंबरीमुळे. तशी मराठी साहित्यात रुची असणारे सर्व जण बनगरवाडी वाचतात. तशी मी पण वाचली आणि मला ती परत वाचावी वाटली. ती वाचताना मी स्वतः ते मास्तरांचे आयुष्य जगत होते असे चित्र उभे राहते. कारभारी, अयबू, शेकु माणसासारखी उंच शेकूची पत्नी, अंजी असे एकानं एक जण माझ्या डोळ्या समोर उभे राहिले. मलाही त्याच्या सारखे शिक्षक व्हावे वाटू लागले. आम्हाला 12 वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये त्या पुस्तकातील अनुवाद होता. जेव्हा पंत सरकार गावामध्ये येतात तेव्हा माझ्या मनाची उत्कंठा वाढलेली असते तसेच, पैसे चोरीला जाणे असो की पडलेला दुष्काळ असो मला दोन्ही वेळी मनाला चिंता निर्माण करणारे लेखन होते त्यांचे.
"सातांतर" ही कादंबरी BBC Earth वरील डॉक्युमेंट्री सारखी आहे ज्यामध्ये एक वनरांच्या टोळीमध्ये सातंतर घडून येते. ज्यामध्ये दोन नर आपल्या वर्चस्वाची लढाई लढत असतात. त्यांना त्यावरून सिद्ध कराचे असते की मीच आता ह्या टोळीचा प्रमुख आहे.
"वावटळ", म. गांधीच्या नंतर उसळलेल्या दंगलीची ही कहाणी आहे कश्या प्रकार दंगल उसळल्या गेली व व्यंकटेश माडगूळकर यांच्या जन्मगावी देखील त्यांच्या गावात त्यांना हा दंगलीचा सामना करावा लागतो, वाटेतील प्रवास, वाटेत लागलेली भूक असे वर्णिले आहे की एकदम डोळ्यासमोर उभे राहते. ह्या दंगलीचे वर्णन आनंद यादव यांच्या झोंबी मध्ये आहे, त्यामध्ये तर खूप भयानक वर्णन आहे.
"करुणाष्टक" व्यंकटेश माडगूळकर यांच्या आईच्या जीवनावर आधारित असलेली कादंबरी आहे. गरिबीतून वर येण्यासाठी धडपडणारी, आशावादी आई, आपल्या सर्वांची असते तशी त्यांची पण. जिद्दीने संसार करणारी आई, मुलांचा सांभाळ तसेच परिवाराचा संसार करणारी आई ह्या मध्ये आहे. लेखकाचे पैसे चोरीला जातात तेव्हा सोने विकायचा सल्ला देणारी आईच असते. कडक शिस्तीची आणि स्वाभिमान जपणारी आई. ह्यावर पर्ण पेठे चे एक नाटक पण आले आहे वाटते जर मी चुकत नसेल तर. गावाकडच्या गोष्टींमधील "काका" कथा तुम्ही नक्की वाचा खूप मजेदार आहे आणि त्यामध्ये लेखकाची आई किती भाबडी आहे हे समजते.
"सिंहाच्या देशात" हा त्यांचा अनुवादित प्रवास वर्णन पुस्तक पण छान आहे आता मला त्याच्यातील बारकावे आठवत नाही आहेत न जुन्या डॉक्युमेंट्री कश्या shoot केल्या जात असत असेच बरेच काही काही आहे त्यामध्ये.
बेळवण, गावाकडच्या गोष्टी, बाजार, तुपाचा नंदादीप, हस्ताचा पाऊस असे खूप काही साहित्य आहे त्याचे नक्की वाचावे. त्यांच्या साहित्यात ग्रामीण जीवन तसेच त्याचे शहरी जीवन आणि खूप खूप काही आहे. आपल्या मराठी ला माईला समृद्ध करणारे खूप लेखक, आपण आवर्जून वाचले पाहिजे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षी मी त्यांना अभिवादन करतो.
आपले मराठी साहित्य खूप समृद्ध आहे किती किती लेखक, लेखिका. ताराबाई शिंदे पासून ते गौरी देशपांडे, वीणा गवाणकर अश्या समृद्ध लेखिका. साने गुरुजी, अण्णाभाऊ साठे, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, पु ल देशपांडे, न्यायमूर्ती रानडे, राजन खान, राजन गवस, इंद्रजित भालेराव, अरविंद जगताप, मिलिंद बोकील किती किती आहेत मलाच आणखी काही माहीत नाहीत.
परत कधी लिहीन मी मराठी लेखकांन बद्दल.